वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही - सनातन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनता साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

यासोबतच वैभव राऊत याने असं काही केलं असावं असं मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत करु असं सांगताना पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, नालासोपाऱ्यात आज पहाटे एटीएसने धडक कारवाई करत, मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्याने खळबळ माजली. नालासोपारा पश्चिम येथील भंडारआळी गावातील वैभव राऊतच्या घरावर एटीएसने छापा टाकला.

श्नान पथकासह, एटीसच्या सर्च ऑपरेशनदरम्यान घरातून अनेक कागदपत्रंसुद्धा जप्त करण्यात आली आहेत.  जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने एटीएसने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत

WebLink : marathi news vaibhav raut do not belong to sanatan sanstha sanjeev punalekar 

संबंधित बातम्या

Saam TV Live