वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पुण्यातील सनबर्न कार्यक्रमात घातपात घडवण्याचा होता कट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नालासोपाऱ्यातील स्फोटकं प्रकरणी वैभव राऊतसह चौघांना कोर्टानं 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय. 

महत्वाचं म्हणजे वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पुण्यातील सनबर्न कार्यक्रमात घातपात घडवण्याचा कट होता. शिवाय त्यांना बेळगांवात पद्मावती शोमध्ये बॉम्बस्फोट करायचे होते अशी माहिती एटीएसनं कोर्टात दिलीय.

यासाठी माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर पैसे पुरवणार होता अशी देखील माहिती एटीएसनं दिलीय.

शरद कळसकरच्या कम्प्युटरमधून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची एकमेकांसमोर चौकशी करण्यासाठी एटीएसनं पोलीस कोठडीची मागणी केली होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live