वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल हा पूर्वीपासूनच वर्तविण्यात आलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, सध्याचे चित्र पाहता अनेक मतदारसंघात आघाडीला थेट वंचित आघाडीचा फटका बसला आहे.

भारिप बहुजन महासंघाचे ऍड. आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अन्य वंचित घटकातील पक्षांशी आघाडी करून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात उमेदवार उतरविले होते. भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे आव्हान होते. वंचित आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसेल असा अंदाज आघाडीच्या नेत्यांकडून वर्तविण्यात येत होता. अखेर तसेच होताना दिसत आहे. 

सोलापूर, सांगली, माढा, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली यासह अनेक मतदारसंघात वंचित आघाडीचा थेट आघाडीला फटका बसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मोठे नेते पिछाडीवर आहेत.  

Web Title: Vanchit Bahujan Aghadi scores big as Congress NCP suffers in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live