वाराणसीत 'मोदी विरुद्ध गांधी' नाही; वाराणसीमधून काँग्रेसची अजय राय यांना उमेदवारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात थेट प्रियांका गांधी यांनाच मैदानात उतरविण्याच्या चर्चा अखेर अफवाच ठरल्या आहेत. वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीमध्येही 'मोदी विरुद्ध गांधी' ही लढत रंगण्याची शक्‍यता मावळली आहे. 

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपसमोर कडवे आव्हान उभे करण्याची काँग्रेसची व्यूहरचना आहे. त्यामुळे खुद्द मोदी यांच्यासमोर प्रियांका गांधी यांना तिकीट देत वाराणसीमध्ये पंतप्रधानांचा मार्ग खडतर करण्याचीही एक शक्‍यता वर्तविण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने प्रियांका यांच्या अधिकृत राजकीय प्रवेशाची घोषणा केली होती. 

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमध्ये 'रोड शो'चे आयोजन केले आहे. मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी अर्ज दाखल करतील, अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यातच काँग्रेसने वाराणसीमधील उमेदवार जाहीर न केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या मेळाव्यातील भाषणामध्ये प्रियांका यांनी 'वाराणसीतून निवडणूक लढवू का' अशी मिश्‍किल टिप्पणीही केली होती. 

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही अजय राय यांनी वाराणसीमधूनच मोदी यांना आव्हान दिले होते. पण मोदी यांनी 3.37 लाखांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला होता.

Web Title: No Priyanka Gandhi vs Narendra Modi faceoff in Varanasi Congress fields Ajay Rai
 
संबंधित बातम्या

Saam TV Live