(Video) - पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

अगरबत्ती विक्रेता महिलेला चोर समजून पोलिसांसमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वसईत बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो.

वसई पश्चिमेकडील पापडी सोनार भट येथे एक महिला एका कम्फर्ट कंपनीच्या अगरबत्ती विक्रीसाठी आली होती. वसई गावात चार दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता. यातील एका चोराला नागरिकांच्या प्रसंगवधनाने पकडण्यात यश आले होते. या घटनेवरून बुधवारी दुपारी घरोघरी अगरबत्ती विक्रीसाठी फिरणाऱ्या महिलेला चोर समजून  स्थानिकांनी मारहाण केली.

दरम्यान महिलेला रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात नेण्याकरिता धक्काबुकी करण्यात येत होती. यावेळी तेथे दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. हा सर्व प्रकार उपस्थित जमावाने कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही. मात्र महिलेला पोलिसांसमोर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात पोलिसांनीही तिला धक्का दिल्याचं दिसून येतंय... 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live