गुजरात किनारपट्टीवर 'वायू'चं थैमान; गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

वायू वादळ अवघ्या काही तासात गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि मासेमाऱांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. वायू वादळ गुजरातच्या किनारी भागामध्ये आज धडकू शकतं, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. कच्छ ते दक्षिण गुजरातपर्यंतच्या पूर्ण किनारपट्टीवर हायऍलर्ट जारी करण्यात आलाय. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांना 'वायू' चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सौराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधील ४०८ गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे ६० लाख लोकांना या चक्रीवादळाचा धोका असल्याचं गुजरात प्रशासनाने स्पष्ट केलंय. 

WebTitle : marathi news vayu cyclone may hit gujrat soon high alert in Gujarat 

संबंधित बातम्या

Saam TV Live