Loksabha 2019 : धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर सांगलीतून लढणार

Loksabha 2019 : धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर सांगलीतून लढणार

विटा - संजयकाका आता याच मैदानात, कोण लायकीचं आहे ठरवू, असे उघड आव्हान देत धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. कोणत्या पक्षाकडून लढायचे हे ठरलेले नाही, मात्र मी मैदानात असेन, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर  केले. 

ते म्हणाले,‘‘दोन महिन्यांपूर्वी खासदार संजय पाटील  यांनी मला जाहीर आव्हान केले होते की, लायकी असेल तर निवडणूक रिंगणात या. मी आज त्यांना आव्हान  करतो तुम्ही ताकदीने लढा, मीही ताकदीने लढतोय. आपल्या दोघांची लायकी जनताच ठरवेल. खासदार  संजय पाटील कालही भाजपात नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही असणार नाहीत. ते भाजपचे काम करत नाही. मी मात्र भाजपमध्ये असताना निष्ठेने वागत आलो.’’

ते म्हणाले,‘‘धनगर आरक्षणाच्या चळवळीमध्ये गेले आठ महिने राज्यभर फिरत होतो. आरक्षणाची भूमिका सरकारची काय आहे, ती जोपर्यंत जाहीर होत नव्हती तोपर्यंत मी माझी भूमिका स्पष्ट करू शकत नव्हतो.  धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत निवडणूक लढवावी, असा लोकांचा आग्रह होता. सांगली जिल्ह्यातील लोकांचीही मी निवडणूक लढवावी अशी भावना आहे. माझा पक्ष, चिन्ह आज माहीत नाही. उद्या काहीही होऊ शकेल. पण लोकसभेच्या रिंगणात मी शंभर टक्के आहे.

जिल्ह्यातील जनतेवर माझा विश्वास आहे. त्यांना या जिल्ह्यातील माजोरी व्यवस्था मोडीत काढायची आहे. ज्यांना सत्तेचा आणि पैशाचा माज आलाय, जे गुंडगिरीची भाषा करतात. अशा लोकांच्या विरुद्ध निवडणूक लढवावी ही लोकांची भावना गृहीत धरून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. एखादा पक्ष माझ्यासोबत आला तर पक्षासोबत अन्यथा नाहीतर अपक्ष लढण्यास तयार आहे.’’

काँग्रेसच्या संपर्कात
गोपीचंद पडळकर यांनी भाजपचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी भाजपचा माझा आता संबंध नाही, असे जाहीर केले होते. आजही त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘‘मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली नाही. मी  काँग्रेससह अन्य सर्व पक्षांच्या संपर्कात आहे.’’

Web Title: Gopichand Padalkar announcement to contest the Sangli Lok Sabha elections

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com