भाज्याचे भाव वधारले,कांदा,साखर महाग

भाज्याचे भाव वधारले,कांदा,साखर महाग

घाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवलेत..  किरकोळ बाजारात सर्वच प्रमुख भाज्यांनी किलोमागे शंभरी गाठली आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील कांदा चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांदादरही किलोमागे ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे..

वाशी आणि कल्याण या घाऊक बाजारांमधील भाज्यांच्या दरातही वाढ झाली. पूरस्थितीच्या वेळी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ३०० ते ३५० गाडय़ांमधून भाज्यांची आवक होत होती. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली असून, सद्य:स्थितीत वाशी बाजारात भाज्यांच्या ५५० ते ६०० गाडय़ांची आवक होत आहे. मात्र, भाज्यांचे दर फारसे कमी झालेले नाहीत. कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार, कारली, पडवळ, काकडी, गाजर, वाटाणा आणि वांगी या भाज्यांचे घाऊक दर किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. पूरग्रस्त जिल्ह्य़ातून मुंबईत शेतमालाची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या घाऊक दरांमध्ये वाढ होताच किरकोळ बाजारात पुराच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू आहे.काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात होणारी शेतमालाची आवक घटली. 

घाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवले आहेत. किरकोळ बाजारात कोबीची विक्री ६० रुपये किलो, फ्लॉवर १०० रुपये किलो, कारली ८० रुपये किलो, वांगी ८० रुपये किलो, भेंडी १०० रुपये किलो, काकडी ६० रुपये किलो दराने होत आहे.

पालेभाज्याही महाग

पालेभाज्यांच्या दरातही किरकोळ बाजारात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. पालकची एक जुडी घाऊक बाजारात १२ रुपये तर किरकोळ बाजारात २० रुपये दराने विकली जात आहे. कांद्याच्या पातीची एक जुडी घाऊक बाजारात २० रुपये आणि किरकोळ बाजारात ३० रुपये दराने विकली जात आहे. लाल माठ प्रति जुडी किरकोळ बाजारात २० रुपये दराने विकली जात आहे. शेपूची एक जुडी घाऊक बाजारात २५ रुपये आणि किरकोळ बाजारात ३० रुपयांनी विकली जात आहे.

कांदा महाग

जोरदार पावसामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील कांदा साठवण चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे तसेच हवामानात बदल झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पेठेत कांद्याची आवक घटल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांद्याच्या फक्त २५ गाडय़ा दाखल झाल्या. एरव्ही तेथे कांद्याच्या दररोज ७५ गाडय़ा येतात. कांद्याच्या दरात घाऊक बाजारात आठवडाभरात ६ रुपयांची तर किरकोळ बाजारात १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे भाज्या महाग असताना दुसरीकडे भाजी बनवताना आवश्यक असणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे. घाऊक बाजारात कांद्याची विक्री प्रति किलो २० रुपये तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने होत आहे. आठवडाभरापूर्वी कांद्याची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो १५ रुपये तर किरकोळ बाजारात १८ रुपये किलोने होत होती. पावसामुळे कांद्याच्या चाळींमध्ये शिरलेले पाणी आणि काही ठिकाणी हवामानात बदल झाल्यामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झालयं.. 

भाज्यांचे दर

 भाजी            घाऊक         किरकोळ 

काकडी       २०                           ६०

दुधी भोपळा   ४०                         ६०

कोबी            २५                          ६०

फ्लॉवर        ४०                         १००

वांगी            ४०                         ८०

घेवडा         ६०                          १२०

भेंडी              ५०                         १००

कारली        ३६                          ८०

पडवळ        ३५                          ६०

गाजर          ३५                         ८०

वाटाणा        ७०                          १००

फरसबी       १२०                        २२०

Web Tittle : Marathi News Vegetable Rate High, onion Rate high 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com