गोव्यात काही महिन्यात लोकसंख्येपेक्षा वाहने अधिक 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पणजी : येत्या काही महिन्यांत गोव्यातील वाहनांची संख्या लोकसंख्येला मागे टाकण्याची शक्‍यता आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 14 लाख 58 हजार 545 आहे आणि सध्याच्या घडीला अंदाजे लोकसंख्या 15.15 लाख अशी होऊ शकते.

सध्याची राज्यातील वाहनांची 14 लाख 10 हजार 882 एवढी संख्या असून, ती 13.9 टक्‍क्‍यांनी वाढत असल्याने काही महिन्यांतच लोकसंख्येलाही वाहने मागे टाकण्याची शक्‍यता आहे. राज्यातील मागील 2015 पासून 2018 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कारची खरेदी करण्याची लोकांची टक्केवारी 28.8 टक्के आहे, तर दुचाकी खरेदी करणाऱ्यांची टक्केवारी 69 टक्के आहे. यावरून राज्यात किती झपाट्याने वाहनांची संख्या वाढतेय याचा अंदाज बांधता येतो.

WebTitle : marathi news vehicle count of goa to increase in comparison to population 

संबंधित बातम्या

Saam TV Live