टॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

गचिबावली : दक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शक जी. विजया निर्मला (वय 73) यांचे आज (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गचिबावली : दक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शक जी. विजया निर्मला (वय 73) यांचे आज (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

विजया निर्मला यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर गचिबावलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी तेथे अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या विजया निर्मला यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्यांनी तेलगू चित्रपटसृष्टीत 44 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. महिला दिग्दर्शकाने तब्बल 44 चित्रपटांचे दिग्दर्शन केल्याने 2002 मध्ये त्यांची गिनिस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली. तेलगू चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे त्यांना रघुपती व्यंकय्या पुरस्कार मिळाला होता. दिग्दर्शक होण्यासाठी त्या नेहमी तेलगू अभिनेत्री सावित्री यांना श्रेय देत होत्या.

तमिळनाडूमध्ये जन्म झालेल्या विजया निर्मला यांचे वडील चित्रपटसृष्टीत होते. मच्छा रेखाई (1950) या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अभिनेते कृष्णा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. 

Web Title: Veteran director and actor G Vijaya Nirmala passed away


संबंधित बातम्या

Saam TV Live