विकी कौशल आता 'या' भूमिकेत दिसणार.

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

बॉलिवूडचा डायनॅमिक बॅचलर विकी कौशल हा ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लूक सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलिवूडचा डायनॅमिक बॅचलर विकी कौशल हा ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लूक सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.

‘मसान’, ‘राजी’, ‘संज्जू’, ‘मनमर्जिया’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या चित्रपटांतून विकीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळीच छाप उमटवली आहे. या चित्रपटांच्या यशानंतर विकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्यात. विकी लवकरच दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आगामी ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. उधम सिंग यांच्या भूमिकेतील फोटोत विकी क्लिन शेव्हमध्ये दिसत आहे. आतापर्यंत विकीच्या बियर्ड लूकवर अनेक तरुण-तरुणी फिदा होते. पण उधम सिंग मधील विकीचा हा वेगळा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘सरदार उधम सिंग’ चित्रपट 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. त्यावेळी जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओ’डॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. विकीचा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

उधम सिंगमध्ये विकीपूर्वी इरफान खान झळकणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे इरफाननेच या चित्रपटासाठी नकार दिला. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूरदेखील या चित्रपटामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

WebTitle : marathi news vicky kaushal will play this role in his new film 


संबंधित बातम्या

Saam TV Live