विदर्भात #HeatWave ; अकोल्यापाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्याची विक्रमी उसळी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

नागपूर - विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच असून, अकोल्यापाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्याने विक्रमी उसळी घेतली आहे. या दोन्ही शहरांमध्ये रविवारी या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.

शनिवारच्या तुलनेत नागपूरचा पारा मात्र किंचित घसरला. उष्णलाट येत्या मंगळवारपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्‍यता प्रादेशिक हवमान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा सर्वाधिक प्रभाव रविवारी अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अमरावती, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दिसून आला. शनिवारी जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला आणि चंद्रपूर येथे आज पारा ४७.२ अंशांवर गेला. मध्य प्रदेशातील खरगोननंतर येथे देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. खरगोन येथे देशात सर्वाधिक ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय ब्रम्हपुरी येथे ४६.३ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ४५.८ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ४५.७ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ येथे ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. शनिवारी या मोसमातील सर्वाधिक ४५.३ अंश सेल्सिअसवर गेलेला पारा चोवीस तासांत ०.४ अंशांनी घसरून ४४.९ अंशांवर आला. ऊन व प्रचंड उकाड्यामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यांना उन्हाचे चटके आणखी एक-दोन दिवस सोसावे लागणार आहेत. त्यानंतर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हळूहळू तापमानात घट अपेक्षित आहे. 

मंगळवारनंतर पावसाची शक्‍यता 
भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, श्रीलंका, तमिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये सध्या कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाला आहे. ‘फनी’ नावाचे हे वादळ पुढील २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असून, ते उत्तरेकडे सरकण्याची दाट शक्‍यता आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात मंगळवारनंतर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: marathi news vidarbha heat wave temperature rise maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live