गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; गोसीखुर्दमधून 4108 क्युसेक पाण्याचा विसर्ग

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून 28 दरवाजे अर्धा मीटर तर 5 दरवाजे 1 मिटरने उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्दमधून 4 हजार 108 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे, गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेश मध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.

गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून 28 दरवाजे अर्धा मीटर तर 5 दरवाजे 1 मिटरने उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्दमधून 4 हजार 108 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छिमारांना नदीत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.

धरणातून सुरू असलेल्या विसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहण्याकरता धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

WebTitle : marathi news vidarbha rain gosekhurd dam water level increased 

संबंधित बातम्या

Saam TV Live