विदर्भातील दहा जागांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल साडे तीन वर्षांनी पहिल्यांदाच नागपुरात आले आहेत. आज उपराजधानीत ते शिवसैनिकांची भेट घेणार असून विदर्भातील सर्व दहाही जागांवरील स्थितीचा आढावा घेतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. स्वतंत्रपणे लढल्यानंतरही विदर्भात सेनेचे केवळ 4 आमदार निवडून आले आहेत. भाजपसोबत युती असताना सेनेचे जवळपास 9 ते 10 आमदार राहत होते. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत चांगले यश अपेक्षित आहे. विदर्भात 62 विधानसभा मतदारसंघ आहेत.

सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल साडे तीन वर्षांनी पहिल्यांदाच नागपुरात आले आहेत. आज उपराजधानीत ते शिवसैनिकांची भेट घेणार असून विदर्भातील सर्व दहाही जागांवरील स्थितीचा आढावा घेतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. स्वतंत्रपणे लढल्यानंतरही विदर्भात सेनेचे केवळ 4 आमदार निवडून आले आहेत. भाजपसोबत युती असताना सेनेचे जवळपास 9 ते 10 आमदार राहत होते. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत चांगले यश अपेक्षित आहे. विदर्भात 62 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांपैकी 15 ते 20 मतदारसंघांवर भगवा फडकायला हवा, अशी सेना नेत्यांची इच्छा आहे. यासाठी काही मतदारसंघावर अधिक भर देण्याचे तसेच भाजप आणि काँग्रेसमधील काहींना पक्षात घेण्यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live