विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेना स्वबळावरच लढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेना स्वबळावरच लढणार हे जवळपास स्पष्ट झालंय. विधान परिषदेसाठी भाजपशी चर्चा न करता शिवसेनेनं तीन जागांवरील उमेदवार जाहीर केलंय. त्यामुळं येत्या 21 मे रोजी सत्तेत एकत्र असलेले भाजप शिवसेना एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. शिवसेनेनं विधान परिषदेच्या हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विपूल बजोरिया यांना उमेदवारी केलीय. विपूल हे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचा मुलगा आहे. परभणी हिंगोलीतही शिवसेना स्वबळावर जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live