विधानसभेत अधिकच्या मतासाठी भाजपच्या चिंतन बैठका सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी आणि नव्याने समोर आलेली आव्हाने यांचा सविस्तर विचार करण्यासाठी भाजपने चिंतन सुरू केले आहे. 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मतदारसंघात काय केले यापेक्षाही काय करायचे राहिले यावर भर देत एकेका मताची बेगमी करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. 

भाजपचा जोर असला तरी बैठकांकडे दुर्लक्ष होणार नसल्याचे संकेत ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा विभागवार आढावा घेणे सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी ‘कोअर ग्रुप’शी चर्चा सुरू केल्या आहेत. 

भाजपला प्रत्येक बुथवर मिळालेली मते, त्यांची समाजशास्त्रीय रचना यांचा तपशीलवार अभ्यास भाजपने गेल्या एक महिन्यात केला असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात एक कोटी ४९ लाख १२ हजार १३९ मते मिळाली होती. ती आता विधानसभेदरम्यान अडीच कोटींपर्यंत न्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सदस्यता अभियानात केले होते.

Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Meeting for Vote Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live