रिपब्लिकन पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही- आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जून 2019

पुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी १० जागांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीबाबत आठवले म्हणाले, ‘‘मागील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप-शिवसेनेने आठ जागा दिल्या होत्या. या वेळी महायुतीमधील मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडल्या जातील. त्यापैकी आमच्या पक्षाला १० जागांबाबत आम्ही आग्रही राहणार आहोत. या दहा जागांपैकी पुणे शहरातील एक व जिल्ह्यातील एका जागेसाठी पक्ष आग्रही आहे. तर, उर्वरित जागा महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना द्याव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे.’’

‘‘देशात अनुसूचित जाती-जमातीपेक्षाही भटक्‍या व विमुक्त जाती-जमातींची स्थिती गंभीर आहे. देशात ६० टक्के सामाजिक आरक्षण आहे. त्यापैकी ८ ते १० टक्के आरक्षण देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे,’’ असेही ते म्हणाले.

Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Ramdas Athawale RPI Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live