विजय माल्ल्या आणि अरूण गवळी पेट्रोल पंपावर काम करताना दिसतील

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

उद्या तुम्हाला मुंबईसह राज्यातल्या पेट्रोलपंपावर विजय माल्ल्या आणि अरूण गवळी काम करताना दिसले तर नवल वाटून देऊ नका. विजय माल्ल्याही लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकत असताना दिसला तर आश्चर्य वाटून देऊ नका. कारण जेलमधील कैद्यांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमनं पेट्रोलपंप देण्याचा प्रस्ताव तयार केलाय. या प्रस्तावानुसार जेलमधील कैद्यांसाठी पेट्रोलपंप देण्याचा प्रयत्न आहे. सध्या तेलंगणात जवळपास १३ पेट्रोलपंप कैद्यांकडून चालवले जातात. त्यामुळं महाराष्ट्रातही असाच प्रस्ताव हिंदुस्तान पेट्रोलियमनं तयार केलाय.

राज्य सरकारकडं हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून पडून आहे. कारागृह प्रशासनाची पेट्रोलपंपाची ही फाईल मंत्रालयात पडून आहे. विजय माल्ल्याला भारतात आणलं नाही. पण जोपर्यंत हा प्रस्ताव मंजूर होईल तोपर्यंत माल्ल्याला भारतात आणलं असेल.

माल्ल्या आणि गवळीसारखे हायप्रोफाईल कैदी पंपावर काम करताना दिसणं जवळपास अशक्य आहे. पण भविष्यात असेच बडे कैदी जेलच्या पेट्रोलपंपावर काम करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

संबंधित बातम्या

Saam TV Live