राष्ट्रवादीच्या सांगलीतल्या कोणत्या नेत्याने घेतली मोहिते पाटील यांची अकलूजमध्ये भेट? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुटीची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महत्वाच्या नेत्याने खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची अकलूजला नुकतीच भेट घेतली. या भेटीत नेमके काय ठरले याबद्दल चर्चेला उधाण आले असून निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भूकंपाची ही चाहूल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीत आपल्याला डावलले जात असल्याची भावना खासदार मोहिते पाटील यांच्या मनात गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या भावनेला मोहिते-पाटील यांनी वाट करून दिली. स्वत: मोहिते-पाटील आजही तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या परिवारातील सर्व तरूणांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी सर्वच मोहिते-पाटीलांनी जीवाचे रान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी जाहीर सभा घेऊन निंबाळकर यांच्यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मोहिते-पाटील यांनी स्त:चे शक्तीप्रदर्शन केले. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीतील एका महत्वाच्या नेत्याने मोहिते-पाटील यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधान आले आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याच्या नियोजनाचा हा भाग असल्याचे सांगितले जात आहे. रणजितसिंह यांनी भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादीत त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळाला नसता, असे मत या नेत्याने मोहिते-पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्याप्रमाणेच आमच्याही जिल्ह्यात अजित पवारांकडून अशीच गटबाजी निर्माण केल्याचे या नेत्याने सांगितले. परंतु आम्ही खंबीर भूमिका घेतल्याने निभाव लागला अन्यथा आम्हालाही तुमच्या सारखे दाबले गेले असते, असेही या नेत्याने म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live