VIDEO | "नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार"

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 28 डिसेंबर 2019

भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.

भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.

विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपत अंतर्गत गटबाजीला ऊत आलाय. नगर जिल्ह्यात राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील वाद शिगेला पोहचलाय. विखेंमुळे नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला असा आरोप राम शिंदेंनी केला. त्यानंतर विखे-शिंदे वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणुकांनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते. 

विधानसभा निवडणुकीपूर्वीच विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली होती. तर मुलगा सुजय विखेच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या. 2014 मध्ये भाजपने नगरमधून 5 जागांवर विजय मिळवला होता.
भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. राम शिंदेंनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यातूनच विखे-शिंदे वादाची ठिणगी उडाली. सत्तास्थापनेची भाजपची स्वप्नं आधीच धुळीस मिळाली आहेत. त्यातच आता पक्षांतर्गत गटबाजी शमवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.

Web Title - Vikhe Patil is responsible for the defeat of the BJP in the city


संबंधित बातम्या

Saam TV Live