'हे' आहेत महाराष्ट्रातील सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

विरोधकांनी पैसे वाटले.. पण मला विश्वास होता 'मी' जिंकेन.. असं म्हणणारे विनोद निकोले. विनोद हे डहाणूचे आमदार आहेत. पालघरच्या डहाणूमधून ते आमदार म्हणून निवडून आलेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या हातून कम्युनिस्टांचा गड त्यांनी खेचून आणलाय. त्यांच्या या कामगिरीनंतर चर्चा रंगली आहे ती त्यांच्या गरिबीची.

कायमच कोट्यवंधींच्या संपत्तीमुळे लोकप्रतिनिधी चर्चेत असतात. मंगलप्रभात लोढा, पराग शाह ही त्यातलीच काही नावं.  पण आता चर्चा आहे निकोलेंची. कारण आहे त्यांची  51 हजार 82 रुपये इतकी संपत्ती. या व्यतिरिक्त निकोलेंचं स्वतःचं घरं सुद्धा नाहीये,

वडील शेतमजूर आहेत. शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून विनोद यांनी एस वाय बीए नंतर शिक्षण सोडून दिलं आणि ओघाओघाने ते राजकारणात आले. 

विनोद निकोले हे  डहाणूतल्या वाकी इथं सध्या ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांची पत्नी आश्रम शाळेत सेविका म्हणून काम करते. तर, निकोले महिन्याकाठी 4 ते 5 हजारांची कमाई करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

विनोद निकोले आता आमदार झालेत आणि विधानसभेत जाणार आहेत.  माकपसाठी गड पुन्हा मिळवल्याचा त्यांना आनंद आहे. निकोले कुटुंबियांसाठी तर मुलाच्या यशाचा आनंद त्याहूनही मोठा आहे. गरिबीतून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला लोकांनी केलेला लाल सलाम हा अधिक आनंददायी आहे आणि प्रेरणा देणारा आहे. 

WebTitle : vinod nikole maharashtras poorest MLA

संबंधित बातम्या

Saam TV Live