विनोद पाटील आणि उद्धव ठाकरे भेट; विनोद पाटलांना शिवसेनेची उमेदवारी?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

मराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसंच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना भवनात झालेल्या या भेटीवेळी मराठा मोर्चाचे अनेक समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

उद्धव ठाकरेंनी विनोद पाटील यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. विनोद पाटील यांनी मुंबईत येत शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे औरंगाबादमधून विनोद पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झालीय.

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी बंडाचं निशाण उभारलं. बंडखोर जाधव आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यात मतविभाजन झालं आणि MIM चे इम्तियाज जलिल निवडून आले. जाधवांच्या मागे अख्खा मराठा मोर्चा उभा राहिल्याची चर्चा होती. औरंगाबादच्या पारंपरिक गडाला जाधवांमुळे खिंडार पडल्याची सल सेना नेतृत्वाच्या मनात आहे. त्यामुळेच जाधवांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाटलांना शिवसेनेकडून विधानसभेला उमेदवारी देण्यात येईल याचं कवित्व रंगायला सुरुवात झालीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live