राम कदमांचा विषय माझ्या खात्यात येत नाही; राष्ट्रवीच्या महिलांना विनोद तावडेंचे उत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज आक्रमकपणे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल जाब विचारून कारवाईची मागणी केली. तावडे यांनी हा विषय गृह खात्याचा आहे मी आपल्या भावना मुख्यमंत्री यांना कळवितो. त्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले.

साताऱ्यात एका कार्यक्रमा निमित्त आलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. दहीहंडी उत्सवाच्या काळात भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सकळीडूनच टिकेची झोड उठवली जात आहे. कदम यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणीही महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. अशा वेळी विनोद तावडे यांच्या पक्षाचे आमदार असलेले राम कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तावडे यांच्याकडे करण्यात आली. 

तावडेनींह प्रकरणाचे गार्भीर्य पाहून, आपल्या अंगावर न घेता या प्रकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात ढकलला आहे. राज्याचे गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. मी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवतो असे केवळ आश्वासन तावडे यांनी दिले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live