विनोद तावडे यांना अखेर उपरती; 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय मागे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

चौफेर टीकेनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अखेर उपरती झाली असून 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग करता येणार आहे.  राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटला होता.

चौफेर टीकेनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अखेर उपरती झाली असून 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग करता येणार आहे.  राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा आदेश मागे घेतल्याची माहिती विधानसभेत दिली. तसंच, यासंदर्भात अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याचं सांगितलं. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live