वर्षातून एकदा नाही तर प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना करावा लागणार योगा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस. देशासह महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा योग दिन साजरा केला जातो. मात्र आता शालेय शिक्षण मंत्री आणि क्रिडा मंत्री विनोद तावडे यांनी दर महिन्याच्या 21 तारखेला स्वतंत्र वेळ राखून ठेवावा असं मत व्यक्त केलंय. 

प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या 21 तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा, असं तावडेंनी सुचवलं.

विनोद तावडेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live