ऑनलाईन शिक्षणाचा धसका घेत विद्यार्थ्याची आत्महत्या, मोबाईलला नेटवर्क नसल्याने विपूल होता तणावात

साम टीव्ही
सोमवार, 3 ऑगस्ट 2020
  • ऑनलाईन शिक्षणाचा धसका विद्यार्थ्याच्या जीवावर
  • विपूल पवार या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
  • नाशिकच्या सुरगण्यात घडली धक्कादायक घटना
  • मोबाईलला नेटवर्क नसल्याने विपूल होता तणावात

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. ऑनलाईन शिक्षणाचा धसका घेत विद्यार्थ्याने आत्महत्या केलीये. नाशिकच्या सुरगण्यात ही धक्कादायक घटना घडलीये. गावात मोबाईलला पुरेसा नेटवर्क नसल्याच्या तणावातून विद्यार्थ्यांनं हे टोकाचं पाऊल उचललंय. विपूल पवार असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने तणावातून घरातच गळफास घेत आपलं जीवन संपलंय. विपूल हा हुशार आणि होतकरू विद्यार्थी होता. कोरोनामुळे केंद्रीय विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्विकार करीत डिजिटल क्लास सुरु केले होते. मात्र बुबळी गावात पुरेशे मोबाइल नेटवर्क नसल्याने त्याला वर्गाचे लेक्चर अटेन्ड करता येत नव्हते. त्यामुळे तो 20 ते 25 दिवसांपासून तणावात होता. पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत.

पाहा सविस्तर व्हिडिओ - 


संबंधित बातम्या

Saam TV Live