VIDEO | जेव्हा रस्त्यावर पडतो पैशांचा पाऊस?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

तुम्ही रस्त्यानं चालत असाल आणि अचानक तुमच्यावर पैशांचा पाऊस पडला तर...? हे सर्व तुम्हाला कदाचित काल्पनिक वाटेल...पण खरंच एका रस्त्यावर पैशांचा पाऊस पडला...कुठे पडला पैशांचा पाऊस चला पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

तुम्ही रस्त्यानं चालत असाल आणि अचानक तुमच्यावर पैशांचा पाऊस पडला तर...? हे सर्व तुम्हाला कदाचित काल्पनिक वाटेल...पण खरंच एका रस्त्यावर पैशांचा पाऊस पडला...कुठे पडला पैशांचा पाऊस चला पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

पैशांचा पाऊस पडला असं आपण ऐकून आहोत...पण, प्रत्यक्षात कुणीही पैशांचा पाऊस पाहिलेला नाही...मात्र, या रस्त्यावर चक्क पैशांचा पाऊस पडत होता...(प्ले व्हिज) पैशांचा पाऊस पडत असल्यानं पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडालीय...दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभरच्या नोटा पडत होत्या...रस्त्यावर असलेला प्रत्येकजण नोटा गोळा करतोय...पण, एवढे पैसे आले तरी कुठून हाच प्रश्न सगळ्यांना पडला...जेवढे पैसे हाती लागले तेवढे पैसे घेऊन लोकांनी पळ काढला...
हा सगळा प्रकार कोलकातामध्ये घडलाय...या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका कंपनीवर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती...त्याचवेळी एका खिडकीतून कुणीतरी नोटांचे बंडल खाली फेकत होतं...सहाव्या मजल्यावरून नोटा खाली पडत असल्यानं त्या हवेत उडत होत्या...त्यामुळं हा सगळा प्रकार पैशांचा पाऊस पडतो तसाच पाहायला मिळत होता. बिल्डिंगमधून खाली पडलेले पैसे लोकांनी गोळा करून लंपास केले...वेळीच हा सगळा प्रकार पोलिसांना कळाल्यानं बिल्डिंग परिसरातून जवळपास साडे तीन लाख रुपये हस्तगत केलेयत...पण, एवढे पैसे फेकून का दिले याची चौकशी आता केली जातेय...पैसे गोळा करत असताना व्हिडीओ बनवण्यात आला...आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Web Title - Viral satya its money raining on road


संबंधित बातम्या

Saam TV Live