कोरोना रूग्ण शोधा, दीड लाख मिळवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020
 • कोरोना रूग्ण शोधा, दीड लाख मिळवा?
 • सोशल मीडियावर मेसेज तुफान व्हायरल
 • काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेयत. त्यातच आता एक दावा केला जातोय. कोरोना रुग्ण शोधा आणि दीड लाख रुपये मिळवा असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होतोय. कोरोना रुग्ण शोधा आणि दीड लाख रुपये मिळवा अशा आशयाचा मेसेज व्हायरल झालाय. हा मेसेज पाहून अनेक जण विचारात पडलेयत...असा कोणता आहे हा मेसेज. पाहुयात...

कोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे सध्या भरमसाट रुग्ण शोधले जात आहेत. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय...
सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक ठिकाणी सापडताय. त्यामुळे कोरोना रुग्ण शोधून दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. पण, कोरोना रुग्णाजवळ जाणंही आपल्यासाठी धोक्याचं आहे. तरीदेखील असे मेसेज कोण व्हायरल करतंय. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधींना प्रयत्न केला.

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

 • प्रत्यक्षात कोरोना रुग्ण शोधल्यावर कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला पैसे मिळत नाहीत
 • शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सभासद पात्र ठरल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घेतो
 • योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णालयाला मिळतात 
 • याच्याशी कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध येत नाही
 • हा मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय
   
 • अशी कोणतीही ऑफर नसून, कोरोना संकटाचा फायदा घेत लोकांची दिशाभूल केली जातेय. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला.


संबंधित बातम्या

Saam TV Live