गुलाबजाम पावाचं काय आहे समीकरण?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

तुम्ही वडापाव नेहमीच खाता. पण, तुम्हाला कुणी गुलाबजाम पाव खायला दिला तर? हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, एका ठिकाणी गुलाबजाम पाव मिळतो असा दावा करण्यात आलाय. नक्की काय आहे हे समीकरण? याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

तुम्ही वडापाव नेहमीच खाता. पण, तुम्हाला कुणी गुलाबजाम पाव खायला दिला तर? हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, एका ठिकाणी गुलाबजाम पाव मिळतो असा दावा करण्यात आलाय. नक्की काय आहे हे समीकरण? याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

गुलाबजामचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं पण, या गुलाबजामनं तोंडचं पाणी सुटवलंय. गुलाबजाम पाव तुम्ही तरी कधी खाल्लाय का.? मात्र, आता गुलाब जाम पावचा फोटो व्हायरल करून नवीन डीश बाजारात आल्याचा दावा करण्यात आलाय. हे चित्रविचित्र समीकरण पाहून नेटकऱ्याचं डोकं गरगरलंय. गुलाबजाम पावाचा विचार जरी केला तरी नको रे बाबा तो गुलाबजाम पाव असंच सगळेजण म्हणतायत. गोड गुलाबजाम आणि पाव खाताना चव कशी लागेल अशीच चर्चा सोशल मीडियावर होतेय. पण, खरंच अशी डीश आलीय का? अशा प्रकारे गुलाबजाम पाव कुणी खातं का? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर सध्या पावात गुलाबजाम असलेला हा फोटो तुफान व्हायरल होतोय. तुम्हीच सांगा कोण गुलाबजाम आणि पाव खाईल? गुलाबजाम आणि पाव? विचार केला तरी अंगावर काटा येतो असं हे समीकरण आहे. गुलाबजाम पावाचं हे विचित्र समीकरण पाहून नेटकऱ्यांनी देखील डोक्याला हात लावून घेतला.

हा गुलाबजाम पावाचा फोटो व्हायरल झाल्यानं वडापाव खवय्यांनी नाराजी व्यक्त केलीय. आमच्या वडापावची अशी वाट लावू नका असंही खवय्यांनी सोशल मीडियावर म्हटलंय. पण, हा फोटो व्हायरल केला तरी कुणी? ही कल्पना सुचली तरी कुणाला? याचाच शोध सध्या नेटकरी घेतायत. पण, या वेगळ्या समीकरणानं सध्या तरी जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title - Viral satya report


संबंधित बातम्या

Saam TV Live