या वर्षाची तारिख लिहीताना शॉर्टकट माराल तर...?

या वर्षाची तारिख लिहीताना शॉर्टकट माराल तर...?

आगामी वर्षात तुम्ही जर तारीख लिहिताना शॉर्टकट मारलात तर नुकसान होऊ शकतं. अंकशास्त्राच्या अभ्यासकांनीच असा दावा केलाय. पण, आगामी वर्षामागचं सत्य काय आहे याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा या सविस्तर विश्लेषणातून...

आगामी वर्ष 2020 मध्ये तारीख लिहित असताना विशेष काळजी घ्यावी लागणाराय. तारीख लिहितांना पूर्ण स्वरूपात लिहिली नाही तर ते महागात पडू शकतं. जर 01/01/2020 ही तारीख लिहियची असेल तर आपल्याला सवयीप्रमाणे आपण 31/01/20 असं शॉर्टकटमध्ये लिहतो. पण, अशा प्रकारे तारीख लिहून चालणार नाही. तर 31/01/2020 अशा पूर्ण स्वरूपात लिहावी लागणार आहे. पण, असं लिहिण्यामागं नक्की काय कारण आहे. याबद्दल अधिक माहिती अंकशास्त्राचे अभ्यासक देऊ शकतात. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं अंकशास्त्राच्या अभ्यासकांकडून अधिक माहिती जाणून घेतली

आकड्यात फेरबदल, आकड्यांचा विस्तार करणे सोपे होऊन हेराफेरी यामुळं फसवणूक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या सोशल मीडियातून याबाबतचे अनेक अफलातून संदेश फिरताना दिसत आहेत. त्यामुळं काय खबरदारी घ्यावी हेदेखील जाणून घेतलं.

 काय आहे सत्य?  काय कराल?

तारीख लिहिताना पूर्णपणे लिहावी. 31/01/2020 लिहायचं असेल तर वर्ष फक्त 20 असं लिहू नये. वर्षामध्ये फेरफार करून सरकारी कामात घोटाळे होऊ शकतात. चेकवरही तारीख, वर्ष लिहिताना संपूर्ण लिहावं. एवढी काळजी घेतली तर कोणतीही फसवणूक होणार नाही. त्यामुळं वर्ष लिहितान शॉर्टकट मारू नका.

Web Title - marathi news Viral satya report

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com