विरार, नालासोपारा उडवण्याचा डाव होता ?

विरार, नालासोपारा उडवण्याचा डाव होता ?

मुंबईच्या वेशीवरच्या विरार-वसई-नालासोपारा उडवण्याचा डाव होता का असा सवाल विचारावासा वाटतो कारण नालासोपाऱ्यातील भांडारआळी इथल्या एका घरातून दहशतवादविरोधी पथकानं मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा आणि आठ गावठी बॉम्ब जप्त केलेत. या प्रकरणी वैभव राऊत याला अटक करण्यात आलीय. 

तीन दिवसांपासून एटीएसचं पथक वैभवच्या मागावर होतं. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात वैभवच्या घरातून व दुकानातून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये गन पावडर, डिटोनेटरचा समावेश आहे. हे सगळं साहित्य बॉम्ब बनविण्यासाठी वापरलं जातं. जप्त करण्यात आलेल्या सामग्रीमध्ये गन पावडर आणि डिटोनेटरचा समावेश आहे. त्यांच्यापासून दोन डझनहून अधिक बॉम्ब बनविता येऊ शकतात. 
वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचा संशय आहे. 'सनातन'नं मात्र वैभव हा आमचा साधक नसल्याचं स्पष्ट केलंय.

वैभव राऊतने ही स्फोटके का आणि कशी जमा केली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. 
एटीएसचं पथक काही दिवसांपासून वैभव राऊतवर सतत पाळत ठेऊन होतं. शेवटी गुरुवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं. मात्र ही स्फोटकं वैभवनं घरात का ठेवली होती?, ती कुठून आणली होती? त्याचा कसा वापर केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिस शोधतायंत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com