विराट-अनुष्का घेत आहेत लंडनभ्रमंतीचा आनंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत इंग्लंडमध्ये वेळ व्यतीत करत आहे. पाकिस्तानबरोबरच्या विजयानंतर भारतीय संघाने सध्या ब्रेक घेतला आहे. रविवारच्या विजयानंतर भारताच्या पुढील सामन्याला बराच अवधी बाकी आहे. अनुष्काही  सध्या इंग्लडमध्ये आली आहे. भारतीय संघाला ब्रेक देण्यात आल्यानं पती पत्नीनं एकत्र वेळ घालवण्याचं ठरवलं आहे. 

इंग्लडच्या रस्त्यावर फिरताना दोघांना अनेक चाहत्यांनी पाहिलं आहे. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तानविरोधात आहे. तत्पुर्वी या दोघांनी लंडनभ्रमंतीचा आनंद घेतला. 

यापूर्वी  क्रिकेट वर्ल्ड कपचे सुरूवातीचे वीस दिवस बीसीसीआयनं भारतीय संघाला आपल्या कुटुंबीय आणि पत्नीसोबत राहण्यास मज्जाव केला होता. भारतासाठी पाकिस्तानसोबतचा समाना होईपर्यंत हा नियम होता. मात्र आता भारत पाकिस्तान सामना पार पडला आहे विशेष म्हणजे हा सामना भारतानं जिंकला देखील आहे. 

Web Title:  Virat - Anushka is enjoying the London Illustrations

संबंधित बातम्या

Saam TV Live