दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विरेंद्र तावडेच

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला अटक करण्यात आली असून, या हत्येमागील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे हाच असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला अटक करण्यात आली असून, या हत्येमागील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे हाच असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला सीबीआयने ताब्यात घेतले आले. सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आले आहे. या चौकशीदरम्यान अन्य काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वीरेंद्र तावडे हा या कटामागील मास्टरमाईंड आहे. सचिन अंदुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्याकडून घटनेत वापरण्यात आलेला वाहन आणि शस्त्र जप्त करण्यासाठी सीबीआयने कोठडी मागीतली आणि न्यायालयाने त्याला कोठडी सुनाविली आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार हे अजून फरार आरोपी आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून रेखाचित्र तयार करण्यात आले होते. रेखाचित्रामध्ये तयार झालेले चेहरे हे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्या चेहऱ्यासारखे दिसतात. मात्र, सारंग अकोलकर आणि विनय पवार हेच मारेकरी आहेत हे रेखाचित्रावरून खात्रीपूर्वक सांगता येत नाही. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची वेगळी चार्जशीट तयार झालेली नाही.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live