विश्वास पाटलांच्या चौकशीची फाईल गायब; SRA घोटाळ्याची CIDमार्फत चौकशी

रामनाथ दवणे
मंगळवार, 13 मार्च 2018

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या समोरच्या अडचणी वाढत चालल्यात. निवृत्तीअगोदरच्या शेवटच्या महिन्यांत त्यांनी मंजूर केलेल्या एसआरएच्या 33 फायलींचा पुन्हा विधिमंडळात गाजला. एसआरएच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या कुंटे समितीचा अहवालच गायब करण्यात आलाय. त्यामुळं या प्रकरणात कारवाईसाठी अडचणी येत असल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं.

एसआरए घोटाळ्याची चौकशी एसआरएतील अधिकारी कसे करू शकतात असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यावर सरकारनं या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले. विश्वास पाटील यांच्यासंदर्भात पूर्वीच कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पण त्यांची चौकशी अहवालाची फाईलच गायब करण्यात आली. त्यामुळं विश्वास पाटलांना कोण वाचवतंय असा सवाल उपस्थित केला जातोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live