प्रशांत किशोर यांची मातोश्रीवरील भेट अमित शहा यांच्या सांगण्यावरून - सूत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

प्रशांत किशोर यांची मातोश्रीवरील भेट ही भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती भाजपतील सूत्रांनी दिलीय.

संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

प्रशांत किशोर हे शिवसेनेचे रणनितीकार असतील अशीही जोरदार चर्चा आहे. दरम्यान प्रशांत किशोर हे चतुर आहेत. त्यांचे व्यावहारीक ज्ञान उत्तम आहे. तसंच भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी अमित शहांची इच्छा आहे. त्यामुळेच शहांनी प्रशांत किशोर यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पाठवलं, अशी माहिती भाजपमधील सूत्रानं दिलीय. 

WebTitle : marathi news visit of prashant kishor at matoshree amit shah shivsena and bjp

संबंधित बातम्या

Saam TV Live