उरी - द सर्जिकल स्ट्राईक नंतर आता बालाकोटवर सिनेमा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.

बालाकोट या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमाची  स्टारकास्ट फायनल झाली असून अभिनेता विवेक ऑबेरॉय या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपिकनंतर विवेकनं या सिनेमाची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उरीच्या यशानंतर आता बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी बॉलिवूडमध्ये सुरू झाली. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलानं पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उध्वस्त केले. या घटनेत भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानात कैद झाले आणि त्यानंतर त्यांची सुखरुप सुटका सुद्धा झाली. ही संपूर्ण घटना आता सिनेमाच्या रुपातून पडद्यावर येणार आहे.

WebTitle : vivek oberoi to produce movie on balakot air strike 

संबंधित बातम्या

Saam TV Live