वर्ध्यात लष्कराच्या दारुगोळा भांडारात भीषण स्फोट;  6 ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

वर्धा डिफेन्स फेक्ट्री मधील दुर्घटनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात येईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय. संरक्षण मंत्र्यांना मदतीसाठी फोन केला असून मुख्यमंत्रीही याविषयावर बोलतील. असंही ते म्हणालेत.

वर्ध्याच्या पुलगावातील लष्करी तळावर जुनी स्फोटकं निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे स्फोट झाला. भारतीय सैन्यासाठी अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या  केंद्रीय दारूगोळा भांडारात हा स्फोट झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून १७ हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या स्फोटात एक जवान शहीद झालाय.. हा स्फोट इतका भीषण होता की आजबाजूचा परिसर हादरुन गेला. 

एका कंपनीला ही स्फोटकं निकामी करण्याच कंत्राट देण्यात आलं होतं. याच कंपनीचे कामगार स्फोटकं निकामी करत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

वर्धा डिफेन्स फेक्ट्री मधील दुर्घटनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात येईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय. संरक्षण मंत्र्यांना मदतीसाठी फोन केला असून मुख्यमंत्रीही याविषयावर बोलतील. असंही ते म्हणालेत. डिफेन्स फॅक्टरीमध्ये असा प्रकार घडू नये त्यासाठी आज पाच वाजेपर्यंत अहवाल द्यायला सांगण्यात आलंय. पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेत काही तडजोड केली का याची ही चौकशी केली जाईल असंही मुनगंटीवार म्हणालेत.

WebTitle : marathi news wardha blast in ammunition base six died in massive blast 


संबंधित बातम्या

Saam TV Live