वारकऱ्यांच्या जीविताला पंढरपुरात धोका

वारकऱ्यांच्या जीविताला पंढरपुरात धोका

विठ्ठल भेटीची आस लागलेले वारकरी लाखोच्या संख्येनं आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात.विठ्ठलाचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी आलेले वारकरी पंढरपुरातील अनेक इमारती, मठ आणि धर्मशाळांमध्ये वास्तव्य करतात.मात्र पंढरपुरातील 114 इमारती, मठ आणि धर्मशाळांमधील वास्तव्य वारकऱ्यांसाठी जीवघेण्या ठरू शकतात.यातील अनेक इमारती तर अत्यंत जीर्ण झाल्यात, काही तर टेकूच्या साहय्यानं तग धरून आहेत..या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात.आणि अशात नगरपरिषदेनं या इमारतींना फक्त नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडलेत.

 पंढरपुरात प्रशासनाकडून भक्तनिवासाची सोय करण्यात आलीय.मात्र लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांच्या तुलनेत ही सोय अत्यंत तोकडीच आहे.पुण्यातील संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याची घटना ताजी आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातील जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे.अशात जर पंढरपुरातील वारकऱ्यांवर एखादा बाका प्रसंग ओढावला, तर त्यातून त्यांची सुटका करायला पांडुरंग येण्याची वाट प्रशासन बघतंय की काय, हाच खरा प्रश्नय.

Web Title: warkari are unsafe at pandharpur 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com