हिंगोली जिल्ह्यातील अनिल गंगाधर जाधव आणि त्यांची पत्नी यांना यंदाचा एकादशीची महापूजेचा मान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

पंढरपूर : मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या महापूजेला येता आले नाही. त्यामुळे विठूरायाची महापूजा करण्याची संधी हिंगोली जिल्ह्यातील अनिल गंगाधर जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा अनिल जाधव ( रा.भगवती. पो.कोडाळी ता.शेणगाव ) यांना मिळाली. गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य पंढरीची पायी वारी करत आहे. 

पंढरपूर : मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या महापूजेला येता आले नाही. त्यामुळे विठूरायाची महापूजा करण्याची संधी हिंगोली जिल्ह्यातील अनिल गंगाधर जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा अनिल जाधव ( रा.भगवती. पो.कोडाळी ता.शेणगाव ) यांना मिळाली. गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य पंढरीची पायी वारी करत आहे. 

 

आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही असा इशारा देऊन मराठा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौरा रद्द करुन वारकऱ्याच्या हस्ते महापूजा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पहाटे अडीच वाजता दर्शनाच्या रांगेतील अनिल गंगाधर जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा अनिल जाधव ( रा.भगवती. पो.कोडाळी ता.शेणगाव जि.हिंगोली) यांना विठूरायाची महापूजा करण्याचा मान मिळाला. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केल्या जाणाऱ्या पूजेत सहभागी होण्याचा मान वारकरी दांम्पत्याला मिळत असतो परंतु यंदा थेट महापूजा करण्याची संधी वारकरी दाम्पत्याला मिळाली. 

याप्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्यायराज्य मंत्री दिलीप कांबळे, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, खासदार अनिल देसाई, आमदार सुरेश खाडे, नगराध्यक्षा साधना भोसले, विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महापूजे नंतर मंदिरातील सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रमात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने जाधव दांम्पत्याचा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले व त्यांच्या पत्नी गौरवीदेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या वतीने एक वर्ष मोफत एसटी प्रवास पास जाधव दांम्पत्यास देण्यात आला. 

यावेळी मंदिर समितीच्या वतीने निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण श्री.रावते यांच्या हस्ते करण्यात आले. निर्मल दिंडी प्रथम पुरस्कार श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक 3 ला , व्दितीय पुरस्कार कोथळी येथील संत मुक्ताई दिंडीला तर तृतीय क्रमांक संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीला देण्यात आला. जलसंपदामंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते वारी काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल भोसले यांनी केले तर आभार गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले.

Web Title: warkari hands of Ashadhi Ekadashis mahapooja in Pandharpur
 


संबंधित बातम्या

Saam TV Live