मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मॉन्सून मुंबईत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. मात्र पावसानं दडी मारल्यानं मुंबईकर पावसाच्या नव्हे तर घामांच्या धारांनी भिजून निघताहेत. पावसाची अशी स्थिती असतानाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्यांनी तळ गाठायला सुरूवात केलीय.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या सातही धरणांमध्ये सध्या  ७३ हजार ७८४ एमएलडी पाणी साठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी २ लाख ५३ हजार एमएलडी पाणी या धरणांमध्ये होते. मुंबईला दररोज ३ हजार ६५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो.

मुंबईकरांसाठी पालिकेने भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोटय़ातील पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे. भातसा धरणातून 2000 एमएलडी तर अप्पर वैतरणा धरणातून 500 एमएलडी पाणी मुंबईकरांसाठी घेतलं जातंय.

पाण्याची अशी भीषण परिस्थिती पाहता  मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केलंय. मुंबईप्रमाणे ठाण्यातही पाण्याची स्थिती गंभीर आहेत. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि भातसा धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

राज्यातील धरणांमध्ये केवळ 6 टक्के पाणीसाठा आहे. साधारणता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून जोरदार बरसतो. मात्र जुलै महिना उजाडत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यानं पालिका अधिकाऱ्यांसह मुंबईकरांची चिंता वाढलीय. लवकरात लवकर धरणक्षेत्रात दमदार पाऊस होऊ दे अशीच प्रार्थना सगळेच करताहेत.

Webtitle : marathi news warning alarm for mumbaikar mumbai has very less water reserve 


  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com