रक्तगटानुसार वाढतोय कोरोनाचा धोका? 'ए' रक्तगटाच्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा 

साम टीव्ही
शुक्रवार, 17 जुलै 2020

 

  • रक्तगटानुसार वाढतोय कोरोनाचा धोका ?
  • 'ए' रक्तगटाच्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा 
  • जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांचा धक्कादायक दावा

कोरोनासंदर्भात दररोज नवनवे खुलासे होतायेत. कोरोनाची लक्षणं, वातावरणाचा प्रभाव या सगळ्या गोष्टीनंतर आता कोरोनाबाबत आणखी एक महत्वपूर्ण दावा केला जातो. तो म्हणजे कोरोना काही रक्तगटांसाठी अधिक धोकादायक आहे.

कोरोना संकट आल्यापासून संशोधक सातत्यानं त्यावर संशोधन करतायेत. आतापर्यंत कोरना कोणत्या वातावरणात टिकतो, त्याची लक्षणं, विविध वयोगटांवरील प्रभाव यावरून अनेक वैज्ञानिक दावे प्रतिदावे केले गेले. त्यात आता भर पडलीय ती रक्तगटाची वेगवेगळ्या रक्तगटांवर कोरोनाचा प्रभाव हा वेगवेगळा असतो असा दावा जर्मनी आणि नॉर्वेच्या संसोधकांनी केलाय. जवळपास 1610 कोरोना रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय. संशोधकांनी नेमकं काय म्हंटलंय पाहा.

ज्यांचा रक्तगट ए आहे. त्यांच्यासाठी कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. ए रक्तगटाच्या व्यक्तीला कोरनाची लागण झाल्यास त्याला ऑक्सिजन देण्याची किंवा व्हॅंटिलेटरची गरज अधिक असते. त्या तुलनेत ओ गटातील लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे. या गटातील लोकांना कोरनाची बाधा झाली तरी रूग्ण गंभीर होण्याचं प्रमाण खुपच कमी आहे. 

थोडक्यात काय तर विविध रक्तगटांनुसार कोरोना कमी जास्त प्रभाव दाखवू शकतो असं जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थात या संशोधनाला WHO किंवा इतर कोणत्याही अधिकृत संस्थेकडून पुष्टी मिळालेली नाही. मात्र तरीही ए रक्तगटाच्या लोकांनी अधिक काळजी घ्यायला हवी आणि ओ रक्तगटाच्या लोकांनी गाफील राहणं चुकीचं ठरेल. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live