पाकड्यांना समजवणार अमेरिका ?

पाकड्यांना समजवणार अमेरिका ?

वॉशिंग्टन : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता अमेरिकेने अशाप्रकारचे हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ''पुलवामातील हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता अशास्वरूपाचे हल्ले थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत'', असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 

ट्रम्प म्हणाले, की सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव कमी व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, पाकिस्तानकडून होत असलेले अशाप्रकारचे हल्ले थांबले जावेत, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. 

दरम्यान, पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानने मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून थेट युद्धाची धमकीच देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या धमकीनंतर अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली.

Web Title: Now US will warns Pakistan says Donald Trump

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com