भारत पाकिस्तानकडून लवकरच चांगली बातमी- ट्रम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

वॉशिंग्टन- भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशासाठी एक चांगली बातमी मिळेल अशी शक्यता वर्तविली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये चालू असलेला तणाव चिंताजनक आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात दोन्ही देशांसाठी एक चागंली बातमी आहे. हा तणाव लवकरच कमी होईल असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राज्य सचिव माईक पॉम्पिओ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा असून 'जैश' आणि मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यात यावं या बाजूनेच अमेरिका आहे, असंही सांगण्यात आल्याची माहिती आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता या दोन्ही देशांना अमेरिकेने विशेष आवाहन केलं आहे. 'दोन्ही देशांनी लष्करी कारवाई टाळायला हवी,' असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

Web Title: We Have Some Reasonably Decent News From India, Pakistan says Donald Trump

संबंधित बातम्या

Saam TV Live