खेकड्यांमुळेच फुटले तिवरे धरण; खुद्द जलसंधारण मंत्र्यांचा जावईशोध

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

मुंबई : खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटले, असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटून आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण अद्याप बेपत्ता आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धऱण मंगळवारी रात्री फुटले होते. या धरण फुटीप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यातच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आता हा अजब दावा केला आहे.

सावंत म्हणाले, की तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारं हे वक्तव्य आहे. खेकड्यांनी धरण फोडलं असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. 2000 साली हे धरण बांधून पूर्ण झालं. मागच्या 15-16 वर्षांपासून या धरणात पाणी साठत होते. जेव्हा धरण गळू लागलं तेव्हा तक्रार करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अजब दावा केला आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे

WebTitle : marathi news water conservation minister says tiware dam breach is result of tampering by crabs.

संबंधित बातम्या

Saam TV Live