मुंबईला पुढील 83 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पुढील 83 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

मुंबई : मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने विश्रांती घेत रिपरिप सुरू केली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.आज सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 3 लाख 3 हजार 290 दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील 83 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 

यावर्षी पावसाळा उशिरा सुरुवात झाल्याने मुंबईकरांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.मागील वर्षी परतीचा पाऊस न पडल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत  पाणी साठा कमी झााला होता.या वर्षी ही जून संपला तरी अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणी साठ्याने तळ गाठला होता.यामुळे पालिकेने राखीव पाणीसाठा वापरण्यास सुरुवात केली होती.

मुंबईला वर्षाला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो.मात्र गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पालिकेने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईकरांवर 10 टक्के पाणीकपात लागू केली होती.तलाव क्षेत्रांत पाऊस बरसण्याच्या अगोदर तलावांत केवळ 71 हजार 17 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.यानंतर ज्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला त्या प्रमाणात पाणीसाठयात ही समाधानकारक वाढ झाली आहे.आज सकाळी 6 वाजेपर्यंत तलावांत 3 लाख 3 हजार 290 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला सध्या दिवसाला 3 हजार 650 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.तलावांत सध्या जो पाणीसाठा आहे तो पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 83 दिवस पुरेल इतका आहे.पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढील दोन महिन्यांत मुंबईला लागणारा पाणीसाठा तलावांमध्ये जमा होईल अशी अपेक्षा पालिकेच्या जल विभागाला आहे. 

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा  -   0 (आकडेवारी मिळाली नाही)

भातसा           -    1,12,058

विहार            -     12,227

तुळशी           -     6,496

मोडकसागर    -     60,773

तानसा            -    49,044

मध्य वैतरणा    -    62,691

एकूण            -   3,03290

Web Title: water storage in Mumbais dam area

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com