मुंबईत वेळेवर पोहोचण्याची हमखास गँरेंटी; कारण आता येणार वॉटर टॅक्सी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

मुंबईकरांचं जलवाहतुकीचं स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. समुद्रीमार्गाने दक्षिण मुंबईतून उपनगरातील इतर ठिकाणांना जोडणारी जलवाहतूक सुरू झाली तर रस्ते वाहतूक आणि रेल्वेसेवेवरील ताण कमी होणारेय. त्याचप्रमाणे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणारेय.

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, सिडको, एमबीपीटी आणि जेएनपीटीचा वाहतूक विभाग यांनी या वाहतुकीसाठी पाच वॉटर टॅक्सी विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. एका वॉटर टॅक्सीची किंमत सात कोटी आहे. या पाच वॉटर टॅक्सींसाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात येणारेत.

1) जलद समुद्रीप्रवास  : 
- ५ वॉटर टॅक्सींची किंमत ३५ कोटी रूपये
- एका वॉटर टॅक्सीत सुमारे 20 प्रवासी बसण्याची क्षमता

२) प्रवासाचा वेळ - 
- रस्ते वाहतुकीला लागणारा वेळ - १ ते २ तास
- मात्र वॉटर टॅक्सीमुळे अर्ध्या तासात प्रवास शक्य

३) इथून होणार जलप्रवास - 
- दक्षिण मुंबईहून मांडवा, ठाणे, ऐरोली, वाशी, नेरुळ, बेलापूर या ठिकाणी वॉटर टॅक्सी वाहतूक होणार. त्यामुळे प्रवासी दक्षिण मुंबईत अर्ध्या तासात या ठिकाणी पोहचू शकणारेत. - या वॉटर टॅक्सीच्या प्रवासामुळे मुंबई आणि उपनगरातील अंतर कमी होणारेय तसंच प्रवाशांचा वेळ वाचणारेय.

४) प्रवासाचे दर
- या जलवाहतूकीसाठीचे दर रस्ते प्रवासासाठी आकरण्यात येणाऱ्या दराएवढेच दर असतील असंही सांगितलं जातंय 

५) कामाचं नियोजन
- सर्व कामं वेळेत पूर्ण झाल्यास ऑक्टोबरपासून वॉटर टॅक्सीसेवा सुरू होणार.

ही जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीची स्थिती, प्रवाशांची सुरक्षितता आणि इतर बाबींचा विचार करून जलप्रवासाचा मार्ग ठरवण्यात येणारेय. काही ठिकाणी तरंगती किंवा तात्पुरती जेट्टी उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

नियोजनाप्रमाणे सर्व कामं पूर्ण झाल्यास ऑक्टोबरपासून ही जलवाहतूक सेवा सुरू होणारेय. नागरिकांना आता मुंबईतल्या मुंबईतही समुद्रीमार्गाने प्रवास करण्याची चांगली संधी चालून आलीय.

WebTitle : marathi news water taxi to start in mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live