बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे तोडणार नाही तर लावणार - उद्धव ठाकरे

सरकारनामा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी एमजीएम कॅम्पस मधील प्रियदर्शनी उद्यानातील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली . स्मारकासाठी शेकडो झाडे तोडली जाणार असा आरोप विविध संघटना आणि पर्यावरण प्रेमींकडून केला जात होता.  मात्र 'स्मारक झाल्यावर तुम्ही बघा , इथे झाडे तोडली नाही तर लावलेली दिसतील'असा शब्द उद्धव ठाकरे यांनी पत्रकार व पर्यावरणप्रेमींना दिला. मी झाडे तोडणार नाही तर आणखीन कशी लावता येतील याचा विचार करतोय असेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी प्रियदर्शनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेची पाहणी केली .पालकमंत्री सुभाष देसाई , प्रधान सचिव अजय मेहता ,महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह त्यांनी या स्मारकाची संपूर्ण माहिती जाणून घेतली .

विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील मेट्रो कारशेडला स्थगिती देत आरे कॉलनीतील एकही झाड यापुढे तोडू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता . परंतु औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती .

तसेच गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी देखील एमजीएमच्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे न तोडता ते उभारण्याची जबाबदारी एमजीएम संस्थेवर सोपवावी अशी भूमिका मांडली होती .

या पार्श्वभूमीवर आजच्या पाहणी वेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडणार नाही, उलट जांभूळ व इतर उपयोगी झाडे कुठे आणि कशी लावता येतील याचा मी विचार करतोय असे सांगत झाड तोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

Web Title - we will not cut the tree for statue of balasaheb says uddhav thakare  

संबंधित बातम्या

Saam TV Live