विदर्भात वादळी वाऱ्यासह आजही गारपिटीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

विदर्दभात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय

हवामान विभागाने हा इशारा दिलाय 

तर, उर्वरीत राज्यात अंशत: ढगाळ व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे

राज्यात सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असून कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

पुणे  : पावसाला पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात आजपासून (ता. ५) वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

राज्याच्या किमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा वाढलेला चटका, ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता. ४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमान होते. दिवसा उन्हाचा ताप वाढला असल्याने मालेगाव, अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ३६ अंशांपार गेले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

विदर्भापासून केरळपर्यंत हवेचा उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पूर्व आणि पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ५) आणि उद्या (ता. ६) विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या उर्वरित भागातही जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१३.७), नगर ३५.२ (१३.३), धुळे ३४.६ (१०.३), जळगाव ३३.८ (१६.७), कोल्हापूर ३३.५ (१९.६), महाबळेश्‍वर २६.४ (१४.०), मालेगाव ३६.६ (१५.२), नाशिक ३१.१ (१४.६), निफाड ३१.० (९.६), सांगली ३४.६ (१८.१), सातारा ३२.७ (१५.२), सोलापूर ३५.१ (२०.०), अलिबाग ३१.२, डहाणू ३०.७ (२०.३), सांताक्रूझ ३०.५ (१९.५), रत्नागिरी ३१.७ (२०.७), औरंगाबाद ३३.०(१७.३), परभणी ३४.४(१८.६), नांदेड ३५.०(१४.५), अकोला ३६.१(१८.५), अमरावती ३५.४(१७.४), बुलडाणा ३३.०(१७.५), चंद्रपूर ३६.०(१८.८), गोंदिया ३२.५(१८.०), नागपूर ३३.९(१५.३), वर्धा ३६.०(१७.८), यवतमाळ -(१६.४).

Web Title weather prediction in vidarbha maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live