'महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 1135, मात्र अद्याप तिसऱ्या स्टेजवर नाही'

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 9 एप्रिल 2020

महाराष्ट्राची कोरोनाबाबतची परिस्थिती गंभीर असली तरी अजून घाबरुन जायचे काही कारण नाही अशी माहिती राजेश टोपो यांनी दिलीय. कोरोनाला तिसऱ्या टप्प्यावर जाण्यापासून रोखण्याचे पूर्ण प्रयत्न असतील असंही ते म्हणालेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चाललाय. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 135 इतकी झालीय. मुंबईत 24 तासांमध्ये 106 रूग्ण वाढले आहेत तर पुण्यात 36 रुग्णांची भर पडलीय. नवी मुंबईत 1, ठाण्यात 3, अकोल्यात 1  तर कल्याणमध्ये 1 रूग्ण वाढलाय. राज्यात कोरोनामुळे एकूण 72 जणांचा मृत्यू झालाय. 

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 1135वर पोहचलीय. मात्र महाराष्ट्र अजूनही करोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आतापर्यंत 117 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत असंही त्यांनी सांगितलं. धारावीबाबत सरकारनं मास्टरप्लॅन तयार केलाय. धारावी पूर्णपणे लॉकडाऊन करणार नाहीत हे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. 

पाहा राजेश टोपेंनी कोरोनाबाबत नेमकी काय माहिती दिलीय -

WEB TITLE - MAHARASHTRA CORONA UPDATE. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live