वाचा! या असतील आजच्या विशेष घडामोडी

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 डिसेंबर 2019

आज राज्यसभेत मोदी सरकारची कसोटी, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आज  राज्यसभेत अग्निपरीक्षा आहे. सोमवारी वादळी चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं. दरम्यान, आज राज्यसभेत या विधेयकाची आणि पर्यायानं मोदी सरकारची कसोटी लागणार आहे.  आज राज्यसभेत मांडण्यात येत असून त्यावरील चर्चेसाठी सहा तासांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे.  या विधेयकावर तीव्र आक्षेप, गोंधळ आणि गदारोळाअंती होऊ घातलेल्या मतविभाजनात प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मोदी सरकारची सरशी होणार काय, हे पाहणं महत्त्वाचंय. 

आज राज्यसभेत मोदी सरकारची कसोटी, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आज  राज्यसभेत अग्निपरीक्षा आहे. सोमवारी वादळी चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं. दरम्यान, आज राज्यसभेत या विधेयकाची आणि पर्यायानं मोदी सरकारची कसोटी लागणार आहे.  आज राज्यसभेत मांडण्यात येत असून त्यावरील चर्चेसाठी सहा तासांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे.  या विधेयकावर तीव्र आक्षेप, गोंधळ आणि गदारोळाअंती होऊ घातलेल्या मतविभाजनात प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मोदी सरकारची सरशी होणार काय, हे पाहणं महत्त्वाचंय. 

नागरिकत्त्व विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकात काही सुधारणा सुचवल्या होत्या, मात्र मतदानावेळी सेनेनं विधेयकाच्या बाजूनंच आपलं मत नोंदवलं. शिवसेनेच्या या भुमिकेवर काँग्रेस हायकमांड नाराज होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलीय. आंधळेपणानं विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

हे ही वाचा -

http://विधेयक मुस्लिमविरोधी - ओवैसींचा दावा, तर आता राज्यसभेत भाजपची परिक्षा

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सुनावणी, सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष

हैदराबाद एन्काऊंटरच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन होण्याची शक्यता आहे. एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय घेणार आहे. या प्रकणातील संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध तपासाची मागणी करणारी याचिका सुनावणीला घ्यावी अशी विनंती केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दखल घेतली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पावर सुनावणी, प्रकल्पाच्या कामाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

महापालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प वादात सापडल्यामुळे गेल्या आठ महिन्यांत केवळ ६.२५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. तसेच ५९३ कोटी रुपये खर्च झाल्यामुळे चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत हुकण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम कोणत्या टप्प्यात आहे? याबाबतची माहिती स्थायी समिती सदस्यांनी मागविली होती. त्याची सुनावणी आज होणार आहे.
 

गोपिनाथगडावर जय्यत तयारी, पंकजा मुंडे उद्या काय बोलणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे गुरुवारी गोपीनाथगडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.  या कार्यक्रमाला भाजप आणि मित्र पक्षातील कोणते नेते उपस्थित राहणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  विधानसभेतील पराभवानंतर पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी, पुढे काय करायचं?  यावर १२ डिसेंबर रोजी बोलणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी फेसबूक पोस्टमधून स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राजकीय वादळही उठलं होतं. उद्या गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे गोपीनाथगडावर कार्यकर्त्यांना येण्याचं आवाहन पंकजांनी केलंय. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका मांडतात, हे महत्त्वाचंय. 

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Todays important news updates...


संबंधित बातम्या

Saam TV Live